सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाईंवर लागणार आता एक्सपायरी डेट
News24सह्याद्री - दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाईंवर लागणार आता एक्सपायरी डेट...पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
मिठाईच्या दुकानातील किंवा डब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते अर्थात या मिठाईची एक्सपायरी डेट काय असणार ? ती कधीपर्यंत खाणे योग्य आहे. याची तारीख टाकण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.
अन्न सुरक्षा व मानदे प्रधिकरण नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणार्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे . या निर्णयानुसार आजपासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतबाह्य तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहेत .
आतापर्यंत पॅकबंद खाद्यपदार्थ अथवा मिष्टणाच्या पाकिटांवर तारीख नमूद करणे बंधनकारक होते मात्र अलीकडे खुल्या पद्धतीने विक्री होणार्या अन्नातून ,विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने मुदतबाह्य तारीख टाकणे बंधनकारक केले केले आहे.
No comments
Post a Comment