Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - धक्कादायक! पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले; महिन्यातील तिसरी घटना...

No comments

   News24सह्याद्री -


पाथर्डी तालुक्यात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला आहे  . तालुक्यातील  मढी, केळवंडी नंतर आता शिरापूर येथेही बिबट्याने एका चिमुकल्याला पळवून नेले आहे  .  डोंगराच्या पायथ्याला राहणार्‍या संजय मुरलीधर बुधवंत यांच्या अवघ्या पाच वर्षाच्या मुलावर  बिबट्याने झडप घातली  . बुधवंत यांची पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेवून पडवीत बसली होती. त्याच दरम्यान बिबट्याने झेप घेवून आईच्या मांडीवर असलेल्या या चिमुकल्याला  उचलून नेले. 

आपल्या डोळ्यासमक्ष मुलाला बिबट्या घेवून जात असल्याचे पाहुन  या चिमुकल्याच्या आईने बिबट्याशी  झुंज दिली. मात्र मुलाला पकडतांना बिबट्याची शेपटीच हातात आली. त्यामुळे बिबट्या  झटका देऊन बाळाला घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलय, तर वनविभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमधून  तीव्र संतापहि  व्यक्त केला जात आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *