Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - जाणून घ्या; कोजागिरी पौर्णिमेचे सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्व...

No comments

News24सह्याद्री  - जाणून घ्या; कोजागिरी पौर्णिमेचे सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्व.....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये



आपल्याकडे हिंदू संस्कृतीत सण, उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक सण, उत्सव फार उत्साहाने साजरा केला जातो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हटलं जात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, मात्र तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.

तर या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. मध्यरात्री दुधात पूर्ण चंद्राची किरणे पडू दिली जातात व त्यानन्तरच  ते दूध प्राशन केले जाते. अशी साधारणतः कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे . या पलीकडे  कृषी संस्कृतीमध्ये देखील या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. 

शेतकरी वर्गामध्ये तर हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. याशिवाय आदिवासी समाजातही कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते . या रात्री आदिवासी बंधू भगिनी होजागरी नृत्य करतात. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हि परंपरा आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *