मोठी बातमी - शिवसेनेत राडा; वाकळे यांच्याविरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल
News24सह्याद्री -
शिवसेनेचे आंदोलन म्हंटले की आठवतो तो राडा, होय शिवसेना आणि आंदोलन आणि राडा हे एक समीकरण जुळले होते. मात्र आता शिवसेनेचा राडा होतोय पन तो कोणत्या प्रश्ना साठी नव्हे तर आपापापसातल्या मतभेतांवरच ,विधानसभे नंतर शिवसेनेत मोठी गटबाजी उफाळून अली होती ती गटबाजी माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतरच. काही दिवसापूर्वीच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून सर्व नवीन जुन्या शिवसैनिकांचा समेट घडवून आणून गटबाजी संपवण्यात यश मिळवले होते. मात्र या गोष्टीतला आठवडाही उलटला नाही तोच पुन्हा शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आलाय. गुलमोहर रॉड येथे एका कार्यलयात सभासद नोंदणी अभियाना संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद लहामगे यांना शिवसेना युवा सेनेचे प्रमुख रवी वाकळे यांनी खुर्ची फेकून मारहाण केली.
तसेच जीव मारण्याची धमकी दिल्याने वाकळे यांच्याविरोधात लहामगे यांनी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेतील गटबाजी संपली असे वाटत असतानाच ती पुन्हा नव्याने उफाळून आली आहे या वाद्यांचे कारणही शुल्लक असून भाषणातील काही मुद्य्यांवर आपण वाकले यांच्या मातीशी सहमत असल्याचे सांगितल्या नंतर हा वाद सुरु झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले आहे.
No comments
Post a Comment