Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नगरमध्ये बनावट डिझेलचा मोठा साठा पकडला; गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ

No comments

  News24सह्याद्री - 


नगरसह संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असताना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर आज नगरमध्ये आले होते. त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरीक्त पोलिस अधीक्षक डॉ. राठोड हेही हजर होते. ही बैठक चालू असतानाच शहरातील स्टेट बँक चौकात अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. या चौकाजवळील छावणी मंडळाच्या व्यापारी संकुलाजवळ एका टँकरद्वारे गाड्यांमध्ये डिझेलसारखा ज्वालाग्रही पदार्थ भरला जात होता.

पोलिस पथकाने हा टँकर ताब्यात घेतला. पुरवठा विभागाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पंचनामा केला. टँकर जागेवर सील करण्यात आला. भिंगारशहराच्या बाहेर एका बंगल्याच्या आवारात गौतम नावाच्या व्यक्तीचा हा बनावट डिझेल तयार करण्याचा कारखानाच असल्याची माहिती समोर आली. गौतमच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणाहून वीस हजार लिटर क्षमता असणारा डिझेलचा टँकर जप्त करण्यात आला. हे सारे सोपस्कर दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाले. 

भिंगार कँप पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे या पथकातील सुर्यवंशी नामक अधिकार्‍याने सांगितले. मात्र, चार तास उलटले तरी कँप पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही माहिती नव्हती. भिंगार कँप पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह अन्य अधिकार्‍यांनाही याची खबर नव्हती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *