सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - लोणी मध्ये सराफाला चोवीस लाखाला लुटले

News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दरोडेखोरांनी डोके वर काढले असून राहता तालुक्यातील लोणी येथील कुलथे ज्वेलर्स या सराफ दुकानात दरोडा घालून सुमारे पस्तीस लोकांचे सोने लुटून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या दुकानाचे मालक संतोष कुलथे हे आपले दुकान बंद करून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांनी कुलथे यांच्या गाडीत ठेवलेल्या तीन ब्यागा असलेल्या सोन्याचे दागिने घेऊन घूम ठोकली या वेळी सराफ व्यावसायिक संतोष कुलथे आणि त्यांच्या सहकार्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचे प्रयत्न केले मात्र दरोडेखोरांनी हत्याराचा धाक दाखवून सोने घेऊन पोबारा केला .
या घटनेमुळे लोणी परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांना याची माहिती कळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन तपास सुरु केला असून सी सी टीव्ही आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
No comments
Post a Comment