Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - गुटखा आणि ऑडिओ क्लिपमुळे तीन अधिकारी खपले, दत्ता राठोड यांना भोवली 'ही' ऑडिओ क्लिप...

No comments

  News24सह्याद्री - 


गुटखा प्रकरणात श्रीरामपूर च्या पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी झाली आणि त्याच दिवशी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे यांची रवानगी मुख्यालयात झाली. दोन्ही ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी  प्रशिक्षनार्थी आईपीस अधिकारी नियुक्त केले आहेत. या दोन बदल्यांपैकी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. डेरे यांच्याशी संभंधित गर्जे या कॉन्स्टेबलचे आणि नगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची जुनी ओळख. पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे मध्यंतरी आजारी होते. त्यावेळी या पदाचा पदभार दत्ता राठोड यांच्या कडे होता. त्या दरम्यान म्हणजेच दि 16 ऑक्टोबर रोजी नेवासा पोलीस ठाण्यातील गर्जे या पोलीस कॉन्स्टेबल सोबत राठोड यांचे बोलणे झाले.

अत्यन्त धक्कादायक असा हा प्रकार आहे. ही क्लिप राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या कडे गेली. त्याची गंभीर दखल घेतली गेली आणि नाशिकच्या आयजी ना चौकशीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, आजारपणातून sp मनोज पाटील हजर झाले आणि त्यांनी चौकशी अहवाल सादर केला. त्यात राठोड यांच्यावर ठपका ठेवला गेला. राठोड यांच्या वर कारवाईच अधिकार डीजी ऑफिस ला असल्याने त्यांच्या वर कारवाई झाली. त्यांच्या कडून नगरचा चार्ज काढून घेण्यात आला आणि त्यांना सध्या कोठेही पोस्टिंग दिली गेली नाही. 

राठोड यांच्यावर कारवाई होण्याच्या दोनदिवस आधी नेवासाचे निरीक्षक डेरे यांची कंट्रोल ला बदली केली गेली. राठोड यांच्याशी फोनवर सेटिंग बाबत बोलणारा गर्जे यास मुख्यालयात आणले गेले आहे. गर्जेची चौकशी चालू असताना आत्ता डेरे यांचीही चौकशी होणार आहे. श्रीरामपूर च्या बहिरट यांचीही चौकशी चालू आहे. दोन पोलीस  निरीक्षक , एक कॉन्स्टेबल यांच्यावर कडक कारवाई करून sp मनोज पाटील यांनी पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या अश्या बदमाश अधिकाऱ्यांना दंडुका दाखवल्याने नागरिकांनमधून समाधान व्यक्त होत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *