Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - धक्कादायक : २२ ट्रका गोडाऊनमध्ये; तरीही दाखविली सर्वांची चोरी अन् विमा कंपनीकडून लाटले लाखो रुपये!

No comments

          News24सह्याद्री -




बनावट डिझेलच्या तस्करीचे मोठे रॅकेट नगरमध्ये उघडकीस आले. हे बनावट आणि बोगस डिझेल बायोडिझेल असल्याचे भासवून त्याची विक्री करणारा गौतम वसंत बेळगे याचा दुसरा गोरख धंदा उघडकीस आला आहे. मोठ्या मालवाहू ट्रक नव्याने खरेदी करायच्या. काही दिवस त्या वापरायच्या आणि त्या गाडीची चोरी झाली असे भासवून त्या-त्या पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करायचा! गौतम बेळगे याने गाडी चोरीस गेल्याच्या अशा तब्बल वीसपेक्षा जास्त फिर्यादी नोंदविल्या आहेत. मालवाहू ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद दाखल होऊन पुढे काही दिवसात सदरची गाडी मिळून येत नसल्याने त्याचा क्लोजर रिपोर्ट संबंधित पोलिस ठाण्यातून तो घ्यायचा! हा क्लोजर रिपोर्ट हाती आल्यानंतर विमा कंपनी त्याला त्या गाडीच्या किंमतीइतकी रक्कम द्यायची! अशा प्रकारे त्याने विमा कंपनीला लाखो रुपयांना गंडा टाकला आहे.दरम्यान, क्लोजर रिपोर्ट हाती येईपर्यंत गौतम बेळगे हा चोरीस न गेलेली ट्रक गोडाऊनमध्ये लावून ठेवायचा.

 किंवा त्या गाडीचा नंबर बनावट पद्धतीने टाकून ती गाडी रस्त्यावर आणायचा! पोलिस आणि आरटीओ यांना गौतम बेळगे याच्या कारनाम्याचा सुगावा लागताच त्यांनी औरंगाबाद रस्त्यावरील त्याच्या गोदामात धाड टाकली आणि तेथून जवळपास ४० पेक्षा बोगस नंबरप्लेटस, पाच मोठ्या ट्रक आणि साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या पाचही ट्रकचे चेसी नंबर, इंजिन नंबर जुळून येत नाहीत.आरटीओ कार्यालयाकडून या सर्व ट्रक जप्त करण्यात आल्या असून आरोपी गौतम बेळगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. अत्यंत शांत डोक्याने बेळगे याने या चोरीच्या आडून लाखो रुपये विमा कंपनीकडून उकळले. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *