Breaking News

1/breakingnews/recent

सारीपाट सह्याद्रीचा - भाजपासह कॉंग्रेस आधीपासूनच सारसनगरच्या दावणीला; शिवसेनेचा एक गटही भरतोय पाणी

No comments

   News24सह्याद्री -



नगरचे राजकारण कधीच सरळ नसते आणि येथील राजकारणीही कधीच सरळ नाहीत! राज्यात सत्तेत असणार्‍या शिवसेना- राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता नगरच्या महापालिकेत नाही! मुळात सर्वाधिक नगरसेवक असतानाही राष्ट्रवादीने त्यावेळी भाजपाला पुढे केले आणि त्यातूनच भाजपाचा महापौर आणि उपमहापौर झाला! स्थायी समिती सभापती निवडीच्या निमित्ताने आज येथे ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या पाहता शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र आल्याचे दिसणारे चित्र वरकरणी आहे. नगर शहरातील शिवसेनेचा एक आधीपासूनच राष्ट्रवादीपेक्षाही आ. संग्राम जगताप यांच्या घरचं पाणी भरत आला आहे. त्यातूनच राठोड यांनी या दगाबाजांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती हे लपून राहिलेले नव्हते आणि नाही. 

मुंबईसह राज्यात शिवसेनेचा जन्म झाला तो संघर्षातून आणि त्यातही हिंदू विरुद्ध मुस्लीम अशा संघर्षातून! नगरही त्याला अपवाद नाही. मात्र, गेल्या वीस वर्षापासून नगरमध्ये जातीय दंगली आणि जातीय संघर्ष कमी झाला आणि नगरच्या शिवसेनेचा संघर्ष सुरू झाला तो कोतकर- कर्डिले- जगताप यांच्या कथीत दादागिरी-गुडगिरी आणि दहशतीच्या मुद्यावर! नगर शहरात या व्याह्यांच्या विरोधात शिवसेना आणि पर्यायाने राठोड यांचे राजकारण कायम फिरत राहिले. त्यातूनच नगरमध्ये शिवसेनेशिवाय अन्य कोणत्याही राजकीय पक्षाचा जन्म झाला नाही! जन्म झाला तो व्यक्तीचा! या व्यक्ती ज्या पक्षात जातील त्या पक्षात त्यांचे समर्थक!

एका खुनाच्या केसमध्ये शिक्षा लागल्याने कोतकर व त्याचे कुटुंबिय तुरुंगात गेले आणि कोतकर यांचे राजकीय करिअर संपले! कोतकर जसे आत गेले तसे लागलीच जगताप राजकारणात सक्रिय झाले. अरुणकाका आणि संग्राम या दोघा पितापुत्रांनी अत्यंत चाणक्षपणे नगरच्या राजकारणावर आणि नगरकरांवर आपली मांड पक्की केली. संग्राम जगताप यांनी महापौर म्हणून काम करताना स्वकीयांसह शिवसेनेच्या नगरसेवकांना चुचकारले आणि त्यांचे हेच चुचकारणे आजही त्यांच्या पथ्यावर पडत आले असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *