Breaking News

1/breakingnews/recent

सारीपाट सह्याद्रीचा - भारतीय जनता पार्टी नगरमध्ये राष्ट्रवादीच्या दावणीला

No comments

    News24सह्याद्री -



राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे वयाने कमी असले तरी त्यांची समयसुचकता प्रचंड मोठी असल्याचे त्यांनी स्वत:च दाखवून दिले आहे. अत्यंत कमी वयात त्यांच्यात विकसीत झालेली जाण ज्येष्ठांनाही हेवा वाटावा अशीच आहे. स्वपक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्व निर्णय ते स्वत: घेत आले आहेत. गत महापालिका निवडणुकीपासून मित्रपक्ष असणार्‍या कॉंग्रेसचे निर्णयही ते स्वत:च घेत आले आहेत. याशिवाय सर्वात नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि पक्षांमध्ये प्रचंड वितुष्ठ असताना नगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा गळ्यात गळे घालून आहे. 

ही किमया देखील आ. संग्राम जगताप यांनीच साधली आहे. मनपाच्या गत निवडणुकीत भाजपाचे १२ नगरसेवक निवडून आले. पक्षाचे शहराध्यक्ष असणारे विद्यमान नगरसेवक महेंद्र ऊर्फ भैय्या गंधे यांचा अपवाद वगळला तर उर्वरीत ११ सदस्य मुळचे भाजपाचे नाहीत याची नोंद घेणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे प्रचंड हसू झाले. स्थायी समितीमध्ये भाजपाचे चार नगरसेवक! यातील एकजण शेवटच्या क्षणी थेट राष्ट्रवादीत दाखल झाला. गळ्यात पंचा घालून त्याने राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आणि दुसर्‍याच दिवशी त्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. भाजपाच्या नगरमधील कथीत श्रेष्ठी म्हणवून घेणार्‍या कोणालाच याचा थांगपत्ता लागला नाही असे म्हणणे आता धाडसाचे होईल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *