सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - कोणी घर देता का घर लाडज वासियांची आर्त हाक !
News24सह्याद्री - कोणी घर देता का घर लाडज वासियांची आर्त हाक !.....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
कुणी घर देता का घर अशी हाक सरकारकडे काहीशी आर्त हाक चंद्रपूर जिल्ह्यातील लाडज या छोट्याश्या गावातील ग्रामस्थ करत आहे. सरकार कोणतेही येवो, जावो मात्र सामान्य माणसांचे प्रश्न आहे तसेच आहेत. अनेक पिढ्या येतात जातात मात्र प्रश्न जैसे थे च राहतात. चंद्रपूर जिल्ह्यातील; ब्रम्हपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले लाडज हे गाव निसर्गाने या गावाला बहरबरून निरसर्ग सौंदर्य दिले, मात्र याच निसर्गाने या गावातील नागरिकांचे जिणे हैराण केले आहे. या गावा जवळून जणाऱ्या वैनगंगा नदीमुळे गेल्या चाळीस वर्षांपासून या गावाला पुराचा फटका बसतोय. पावसाळ्यात तर या गावाला बेटाचे स्वरूप येते.
वैनगंगा नदीला दरवर्षी पूर येत असतो. त्यामुळे येथील जनता आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. गावाला जोडणारा रस्ता नसल्यामुळे लाकडी नावेतून प्रवास करावा लागतो.तेव्हा पुरामुळे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जीवितहानी होत असते. गावात आरोग्य केंद्र नाही .प्राथमिक शिक्षणाशिवाय शिक्षणाची सोय नाही. यासारख्या इतर नागरी सुविधांचा अभाव आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने उदरनिर्वाहाकरिता शेती किंवा कुठलीही साधने उपलब्ध करून दिलेली नाहीत.
नुकताच मागील महिन्यात ऑगस्ट वैनगंगा नदीला महापूर अल्यामुळे व पुराचे पाणी संपूर्ण शेतशिवारात व गावात शिरल्याने गावसभोवतालची दरड खचलीय. त्यामुळे घरांना व जीविताला धोका निर्माण झाला होता .प्रशासनाच्या दक्षतेमुळे रेस्कू ऑपरेशन करून हेलिकॉप्टर व बोटीद्वारे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी ठिकाणी आणून त्यांना अन्न व निवाऱ्याची प्रशासनाला सोय करावी लागली.
No comments
Post a Comment