सह्याद्री ब्रेकिंग - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष
News24सह्याद्री -
लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याचा निकाल दिला आहे. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागले असून, बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले आहे.
तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आले आहे. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजरअसून, लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती.
न्यायालयाने यावेळी सांगितले आहे कि, सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करताना “विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही”. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचं सांगितले आहे.
No comments
Post a Comment