सारीपाट सह्याद्रीचा - डीएसपी मनोज पाटील साहेब, वेलकम टू नगर!
News24सह्याद्री -
निष्क्रीय ठरल्यानंतर नगरमधून बदली झालेले पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली. मात्र, या सहा महिन्यात पोलिस दलात मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी वाढली. विशेषत: नगर शहरातील कोतवालीसह तोफखाना, भिंगार कँप आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असणारे अवैध धंदे आणि त्याला मिळणारा छुपा आशीर्वाद आता लपून राहिलेला नाही. जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून नगर शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करतानाच अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले असले तरी पोलिस ठाण्यांमधून त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एकूणच नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना सुत्रे हाती घेतल्याबरोबर नगर शहरात लक्ष घालण्याचे काम करावे लागणार आहे.
नव्याने हजर होत असलेले मनोज पाटील यांना खाकीची प्रतिमा वाढीस लावण्याचे काम करावे लागणार आहे. मध्यंतरीच्या काळात या वर्दीला काही डाग लागले. हे डाग पुसण्याचे काम करावे लागणार आहे. नगरमधील काही अधिकारी हे ड्रस्कीन करन्सीफमध्ये गुंतले असल्याचे अखिलेशकुमार यांच्या अनेकांनी निदर्शनास आणून दिले. त्याचे पुरावेही दिले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता मनोज पाटील यांना त्यात लक्ष घालावे लागणार आहे.
नगर शहरात लक्ष घालतानाच शहराच्या लगत असणार्या नगर तालुका, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा या पोलिस ठाण्यांचे काम काही दलालांच्या हाती गेले असल्याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. काही पोलिस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचार्यांचे लागेबांधे हे थेट गुन्हेगारांशी आणि गुन्हेगारी टोळ्या चालविणार्यांशी आले आहेत. हे लागेबांधे शोधून खाकी वर्दीला बदनाम करणार्या अशा बदमाश अधिकार्यांचा बंदोबस्त करण्याचे काही नव्या अधीक्षकांना करावे लागणार आहे.
No comments
Post a Comment