सह्याद्री ब्रेकिंग - एसपी अखिलेशकुमारयांनी जाता-जाता मर्जीतील कर्मचार्यांना दिल्या मलिद्याच्या बदल्या
News24सह्याद्री -
नगरमध्ये हजर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सपशेल अयशस्वी ठरलेले नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची नगरमधून नुकतीच बदली झाले. मनोज पाटील हे आता नगरमध्ये दोन- तीन दिवसात येऊन पदभार घेणार असताना अखिलेश कुमार सिंह यांनी त्यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटी करणार्यांसह चालक व अन्य काही मर्जीतील पोलिस कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले. सन २०१७ आणि सन २०१८ या सालात पोलिस भरती झालेल्यांचे आणि एसपीसाहेबांच्या मर्जीत असणार्यांचे हे बदली आदेश आहेत.
दोन-तीन महिने आधी सन २०१६ मध्ये भरती झालेल्या काही कर्मचार्यांनी याच पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि बदली करण्याची विनंती केली. मात्र, तुमचे पाच वर्षे पूर्ण झालेले नसल्याने तुम्हाला बदली आदेश देता येणार नाही, असे सांगून त्यांच्या बदल्यांना नकार दिला. मात्र, आता दोन महिन्यातच त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि सन २०१६ च्यानंतर म्हणजेच सन २०१७ आणि सन २०१८ मध्ये भरती झालेल्या काही कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले.
No comments
Post a Comment