कोरोनामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन
अहमदनगर । News24सह्याद्री -
पुण्यात एका वृत्तवाहीनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने अहमदनगरसह पुण्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हार्ट अटॅक आल्याने निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. पांडुरंग रायकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील होते.
त्यांचे ( इयत्ता 11 वी व 12 वी - शास्त्र शाखा) शिक्षण श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात झाले होते. रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या. पत्रकार पांडुरंग रायकर यांचेही व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने निधन झाले आहे.
No comments
Post a Comment