मोठी बातमी - नगर मनपा:आघाडी धर्मासाठी योगिराज गाडे यांची माघार; राष्ट्रवादीचे मनोज कोतकर स्थायीचे बिनविरोध सभापती
News24सह्याद्री -
अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख आणि संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या निवडक पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी सहभागी असताना नगरमध्ये या दोघांमध्येच निवडणूक होणे चुकीचे ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आणि शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
No comments
Post a Comment