Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अखेर रुई चोंड्यात बुडून मृत्यू पावलेल्या पोलिसाचा मृतदेह सापडला

No comments

    News24सह्याद्री - 



गेल्या दोन दिवसांपूर्वी रुईचोंडा धबढाब्यात बुडून मृत्यू पावलेल्या रेल्वे पोलिसाचा मृतदेह अखेर सापडला, वासुंदे येथील शिकारी गावजवळील ठाकरवाडीत हा मृतदेह आढळून आला, स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, तसेच एनडीआरफचे पथक गेल्या दोन दिवसांपासून या मृतदेहाचा शोध घेत होते मात्र हा मृतदेह धबधब्यापासून १२ किलोमीटर असणाऱ्या ठाकरवाडीत सापडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे, मृतदेह मिळाल्याची माहिती समजताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक राजेश गवळी घटनास्थळी रवाना झाले.  

जवळपास ४८ तासांच्या शोध मोहिमेनंतर  रेल्वे पोलीस गणेश दहीफळेंचा मृतदेह सापडला, प्रेक्षकहो पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली असतानाही अनेक पर्यटक नियमांचं उल्लंघन  करून पर्यटनस्थानवर जाताहेत, मात्र स्थानिक पोलीस याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसताहेत , परंतु आता पोलिसांच्याच जीव गेल्यानन्तर तरी स्थानिक पोलीस घटनेचे गांभीर्य ओळखून खडबडून जागे होत पर्यटकांना आवर घालणार का कि नेहमीप्रमाणेच दुर्लक्षज करणार हे पाहून महत्वाचं ठरेल.   

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *