Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - नगरचे राजकारण : भाजपाचे मनोज कोतकर राष्ट्रवादीत; होणार स्थायीचे सभापती

No comments

    News24सह्याद्री  - 



महानगरपालिकेच्या स्थायी सभापती निवडीला काही तास बाकी असताना नगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजपाकडून निवडून आलेले मनोज कोतकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ६ झाले आहे. कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर स्थायी सभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केला. शिवसेनेचे पाच सदस्य स्थायी समितीमध्ये आहेत. शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीमध्ये आता शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादीचे सहा, कॉंग्रेसचा एक, भाजपाचे तीन, बसपाचा एक असे सदस्य आहेत. नगरच्या महापालिकेत याआधीच राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर भाजपचा महापौर, उपमहापौर आहे. आता राज्याच्या बदलत्या सत्ता समिकरणारत शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *