मोठी बातमी - कोरोनाग्रस्त गॅसवर : ‘रेमडीसीवर’ इंजेक्शनचा काळा बाजार
News24सह्याद्री -
कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी काळजीची बातमी आहे. कोरोना या संसर्ग जन्य आजारावर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. मात्र, असे असले तरी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला ‘रेमडीसीवर’ या इंजेक्शनचा आधार मिळत आहे. सहा इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण यातून बरा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच पॉझिटीव्ह रुग्णाला या इंजेक्शनचा आधार मिळाला आहे. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात हे इंजेक्शन मिळतच नाही! इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धडधड वाढीस लागली आहे.
साधारणपणे चार हजार चारशे रुपयांना एक या प्रमाणे सहा इंजेक्शन रुग्णाला दिली जातात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हे इजेक्शन नगरमध्ये मिळत नाही. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी हे इंजेक्शन पंधरा ते वीस हजार रुपयांना एक याप्रमाणे काळ्या बाजारात विकत घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
No comments
Post a Comment