सह्याद्री ब्रेकिंग - ग्रामपंचायतींवर खासगी व्यक्तीची प्रशासक नियुक्ती नाहीच
News24सह्याद्री -
गावागावातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची याचा तिढा अद्यापही कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर खासगी व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यास आज तात्पुरती स्थगिती दिलीय.
या स्थगितीमुळे गुडघ्याला बाशिंग बांधून प्रशासक होण्याची स्वप्न पाहणार्यांचे मनसुबे पुन्हा धुळीस मिळाले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींवर केवळ सरकारी अधिकार्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे.
No comments
Post a Comment