जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; सेनेच्या वाघाची नगर जिल्ह्यात डरकाळी घुमणार!
मुंबई | news 24 सह्याद्री-
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गडाख यांनी आमदार म्हणून निवडून येताच शिवसेनेला पाठींबा दिला होता. शिवसेेनेच्या कोट्यातून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात ते सध्या मृद व जलसंधारण मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
शिवसेनेचे् माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगर जिल्हयात शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. मात्र शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशानंतर ती भरुन निघणार असल्याचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.

शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आता गडाखांना शिवसेनत अधिकृत प्रवेश केल्याने जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. जिल्हा सहकारी बँकेचे ते काही वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. गडाख हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमदार आहेत. गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्यांनं विजयी झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापने दरम्यान शिवसेनेला पाठिंबा दिला होता. गडाख हे सध्या उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment