माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली | News24सह्याद्री -
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी रुग्णालयात गेले असता कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरणात राहण्याचं तसंच चाचणी करण्याची विनंती केली आहे.
प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे”.
No comments
Post a Comment