Breaking News

1/breakingnews/recent

नीट, जेईई परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

No comments

 नवी दिल्ली । News24सह्याद्री - 




कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती मात्र परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली असून, सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित वेळेत होणार आहे.

न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली असून, धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *