Breaking News

1/breakingnews/recent

तुकाराम मुंढे कोरोना पॉसिटीव्ह

No comments

 नागपूर । News24सह्याद्री - 




शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली असून, नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, आपण नक्की जिंकू, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुकाराम मुंढे यांनी मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *