"... तर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”
माजी खासदार निलेश राणे यांचा राज्य सरकारवर निशाणा
मुंबई । News24सह्याद्री -
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाची चौकशी बिहार पोलिसांनी न करता मुंबई पोलिसांना करु द्यावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. आता या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे असं वक्तव्य निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
No comments
Post a Comment