जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; सेनेच्या वाघाची नगर जिल्ह्यात डरकाळी घुमणार!
मुंबई | News24सह्याद्री -
नेवासा मतदारसंघातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गडाख यांनी आमदार म्हणून निवडून येताच शिवसेनेला पाठींबा दिला होता. शिवसेेनेच्या कोट्यातून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात ते सध्या मृद व जलसंधारण मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
No comments
Post a Comment