Breaking News

1/breakingnews/recent

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

No comments

 मुंबई । News24सह्याद्री - 


राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करण्यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना दिले जातात. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं.

या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. मध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *