माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांची ट्विटद्वारे माहिती
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर काही दिवसापासून आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . मात्र आता प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी आज सकाळी ट्विटद्वारे दिली. तसेच प्रकृती स्थिर असली तरी अद्याप प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची १० ऑगस्ट रोजी मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली, यावेळी त्यांच्या मेंदूमधून रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा पासून त्यांच्यावर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
No comments
Post a Comment