Breaking News

1/breakingnews/recent

सरकारचा मोठा निर्णय : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ

No comments

 मुंबई । News24सह्याद्री -


सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे.

त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असेही मंत्री शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *