सह्याद्री ब्रेकिंग । पालकमंत्र्यांच्या बैठकीआधी ‘एलसीबी’चा मोठा मासा लाचेच्या सापळ्यात!
अहमदनगर | News24सह्याद्री -
कोरोना संसर्ग आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्यांची आढावा बैठक सुरू होण्याच्या काही क्षण आधी स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीचा मोठा मासा लाचेच्या जाळ्यात पकडला गेला. पोलिस अधीक्षकांचे कार्यालय आणि एलसीबीचे कार्यालय एकाच मजल्यावर! पोलिस अधीक्षकांच्या खास मर्जीतील ही गुन्हे शाखा ओळखली जाते. या गुन्हे शाखेचे ‘कलेक्टर’ म्हणून ज्यांना ओळखले जाते असा मोठा कलेक्टर लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला! लाचलुचपत विभागाच्या नाशिक कार्यालयाने ही लाचखोरी उघडकीस आणली! नगरच्या लाचलुचपत कार्यालयाला याबाबत थांगपत्ताही लागला नाही!. पोलिस अधिकारी- कर्मचार्यांच्या लाचेची माहिती आता नगरच्या एसीबी कार्यालयाला द्यायला कोणीच धजावताना दिसत नाही! याचाच अर्थ एसीबीच्या नगरच्या कार्यालयाची विश्वासर्हताच संपुष्टात आली आहे.
No comments
Post a Comment