Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - कोरोना बाधित मृतदेहांवरील अंत्यसंस्कार झाले ठप्प; अनेक मृतदेह शवागारात पडून

No comments

 News24सह्याद्री  - 


कोरोनासंसर्गाने मयत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत दाहिनीत ‘वेटींग’ सुरू होते. तासणतास प्रतिक्षा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहावर नगरमध्ये अंत्यसंस्कार केले जात असताना आता हे अंत्यसंस्कारच थांबविले गेले आहेेत.

नगरच्या महापालिकेने संबंधित ठेकेदाराला बील दिले नसल्याचे कारण सांगून ठेकेदाराने हे काम थांबविले. पर्यायी व्यवस्था नसल्याने शनिवारी सकाळपासून अंत्यविधीसाठी नातेवाईक अधिकार्‍यांकडे धावपळ करत होते. ठेकेदाराच्या बिलासंदर्भात वाद असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनीही मान्य केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *