Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर शहर सहकारी बँकेत मोठी अफरातफर

No comments

 News24सह्याद्री - 




नगर शहरातील धरती चौक येथे फिर्यादीची माणक एंटरप्रायजेस ही फर्म आहे. खाद्य पदार्थाची होलसेल विक्री व रिटेल विक्री या फर्ममधून केली जाते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी बंँकेकडे कर्ज मागणी केली. दि. १७ जानेवारी २०१९ रोजी त्यांना तीन कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यातील २ कोटी ३० लाख रुपये कॅॅशक्रेडीट कर्ज आणि ७० लाखांचे कर्ज टर्मलोन म्हणून मंजूर करण्यात आले. कर्जदाराकडून बँकेने सिक्युरीटी पोटी दहा कोरे सह्या केलेले चेक घेतले.

काही महिन्यानंतर बच्छावत यांनी बँकेत जाऊन माहिती घेतली असता सात वेगवेगळ्या फर्मच्या नावे त्यांची २ कोटी ७३लाख ५५ हजाराची रक्कम वर्ग केल्याचे दिसले. यासाठी त्यांनी बँकेला दिलेले कोरे चेक वापरण्यात आले. ज्या फर्मच्या नावे ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे, त्या फर्मची कोणतीही माहिती आपणास नसल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. याबाबत फिर्यादीने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. 

आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या संचालकांसह अधिकार्‍यांचे जबाब नोंदविले. त्यानुसार तपास केला असता बँकेने संगनमत करून अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिस अधिक्षकांनी आदेश दिल्यानंतर रात्री उशिरा बँकेच्या संबंधितांवर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *