Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री क्राईम अलर्ट - बलात्काराची केस मागे घेत नाही म्हणून तिच्या मुलीलाच ‘त्यांनी’ पेटविले

No comments

 News24सह्याद्री  - बलात्काराची केस मागे घेत नाही म्हणून तिच्या मुलीलाच ‘त्यांनी’ पेटविले ....पहा सह्याद्री क्राईम अलर्ट मध्ये 


अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पळवे खुर्द या गावातील एका महिलेवर दोघा नराधमांनी काही दिवसांपूर्वी अत्याचार केला! बलात्काराच्या या घटनेनंतर सदर महिलेने त्या नराधमांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. 

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक झाली. मात्र त्यानंतर तो जामिनावर सुटला! जामिनावर सुटल्यानंतर या आरोपीने दोन दिवसांपूर्वी वाघुंडे शिवारातील त्या महिलेची झोपडी गाठली आणि त्या २६ वर्षीय महिलेला बलात्काराची केस मागे घे असा दम दिला. त्याचवेळी त्या महिलेची १० वर्ष वय असणारी मुलगी बाहेर आली असता त्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल ओतले आणि दुसर्‍याने पेटती काडी फेकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सदरची मुलगी गंभीर भाजली असून तिच्यावर उपचार चालू आहेत.

या प्रकरणात राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा. पळवे खु) यांच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच दि. १४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयल केल्याचा व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलमे लावण्यात आली आहेत.  पुढील तपास पोलिस उपअधिक्षक अजित पाटील करत आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *