Breaking News

1/breakingnews/recent

के. के. रेंजबाबत राज्य सरकारने भूमिका घेतली तर केंद्र सुद्धा दिलासा देणार - विखे पाटील

No comments

अहमदनगर |  News24सह्याद्री - 

जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नगर तालुक्यातील बहुचर्चित के. के. रेंज विस्तारीकरणाचा मुद्दा राज्य सरकारच्या कोर्टात आला असल्याचे दिसते. लष्कराच्या सराव क्षेत्राच्या हद्द वाढीच्या अनुषंगाने या तीन तालुक्यातील जमिनी संपादीत केल्या जाणार आहेत. जमिनींच्या सातबारा उतार्‍यावर लष्कराचे शिक्के पडले आहेत. लष्करासाठी भूसंपादन होणार नाही असे वाटत असतानाच दोन दिवसांपूर्वी या तीनही तालुक्यातील संंबंधित क्षेत्राची लष्करी अधिकार्‍यांनी पाहणी केली. त्यामुळे या तीनही तालुक्यातील बाधीत गावांमध्ये घबराट आणि चिंता व्यक्त होऊ लागली. दरम्यान, या बाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज नवीदिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि लष्करी कवायती व लष्कराचा कथीत सर्वे याठिकाणी स्थगित करण्याची विनंती सुद्धा शिष्टमंडळाने संरक्षणमंत्र्यांना केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *