सह्याद्री ब्रेकिंग । कोरोना योद्धीच झाली कोरोना पॉझेटिव्ह
News24सह्याद्री -
पारनेर प्रशासनच्या प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या महिला,अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. यामुळे पारनेर प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्याने नेहमीच कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून परिस्थिती हाताळली आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसाठी नेहमी रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र रिपोर्ट जरी पॉजिटीव्ह आला असला तरी त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
No comments
Post a Comment