Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - मृतदेह कोंबल्याच्या प्रकरणी मनपाला आली जाग; दोषींना बजावली नोटीस

No comments


 अहमदनगर |  News24सह्याद्री - 


जिल्हा रुग्णालयात मृत झालेल्या व्यक्तींचे एकावर एक असे जवळपास १२ मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत ठेवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. यानंतर मृतदेहांची ही विटंबना संतापजनक घटना असल्याने शहरात असंतोष उफाळला. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. न्यूज २४ सह्याद्रीच्या माध्यमातून सदर प्रकरण जाहीरपणे चव्हाट्यावर आल्यानंतर या प्रकाराची आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनीही दखल घेतली आहे. 

असे असले तरी महापालिका आरोग्य विभागाचे प्रमुख अथवा तत्सम अधिकार्‍याला नोटीस बजावली गेली नाही. कर्मचार्‍याला नोटीस बजावली गेल्याने आयुक्त आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे साटेलोटे आहे काय असा सवाल निर्माण होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *