Breaking News

1/breakingnews/recent

सत्यजीत तांबे यांचा मित्रपक्षाला 'हा' सवाल

No comments
ट्विट करत व्यक्त केली नाराजी
News24सह्याद्री - 

मुंबई ।
महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटल्याच दिसत आहे. युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट करत मित्रपक्षाला सवाल केला आहे. राज्य सरकारनं सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच फोटोंना स्थान देण्यात आल्यानं, “ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची?,” असा सवाल सत्यजित तांबे यांनी मित्र पक्षांना केला आहे.

वेळोवेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराजीचे नाट्य रंगत आलेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या चर्चा झाल्यांनतर कुठेतरी नाराजीचे सत्र संपतंय ना संपतंय तोच पुन्हा एकदा काँग्रेसने मित्र पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसरकारनं सुरु केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते असून, त्यावर काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केला आहे.

“महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचं गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे,” असा सवाल सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/satyajeettambe/status/1283615971932925952?s=20

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *