Breaking News

1/breakingnews/recent

माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

No comments
News24सह्याद्री -

लातूर । वृत्तसंस्था -
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्याचा विचार सुरू असून सध्या ते लातूरमध्येच उपचार घेत आहेत. असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना त्रास जाणवत होता. १४ तारखेला त्यांना ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर निलंग्यातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना लातूरला हलवण्यात आले. तिथं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, तिथं त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती अगदी स्थिर आहे. त्यांचा स्वभाव लढवय्या आहे. ते या आजारावर मात करून ठणठणीत बरे होतील,' असा विश्वास माजी मंत्री व निलंगेकरांचे नातू संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

अनेक कार्यकर्त्यांच्या शिवाजीरावांकडे राबता असतो. मात्र, कोरोनाच्या काळात ते घरातच होते. वयोमानामुळे कुटुंबीयांकडून त्यांची काळजीही घेतली जात होती. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *