Breaking News

1/breakingnews/recent

१ ते १० वी मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी चार युट्युब चॅनेल : शिक्षणमंत्री

No comments
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरद्वारे माहिती

News24सह्याद्री - 

मुंबई ।
कोरोना महामारीमुळे शाळा सुरु करणे धोक्याचे असल्या कारणाने ऑनलाईन वर्गाचे नियोजन करण्यात आले. १५ जून पासून शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने त्या जिल्ह्यच्या कोरोनाच्या परिस्थितींनुसार प्रत्यक्ष शाळा चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले तसेच लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत आहे. चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.





“इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्हीवर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत” राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *