सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी
काँग्रेस विधिमंडळाची बैठक सुरु
News24सह्याद्री -
नवी दिल्ली ।
राजस्थानमधील सत्तासंघर्षाला वेगळ वळण लागण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने गेहलोत सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जयपूरमधील फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळाची बैठक सुरु आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार या बैठकीला १०२ आमदार उपस्थित असून त्यांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारल्याने गेहलोत सरकारच्या अस्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. त्या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आजची काँग्रेस विधिमंडळ बैठक घेण्यात आली आहे.

No comments
Post a Comment