Breaking News

1/breakingnews/recent

"हि तर नाटकाची स्क्रिप्ट..." विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

No comments
News24सह्याद्री - 


मुंबई : 
महाविकास आघाडी कोरोनाच्या लढ्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजपने राज्यसरकार विरोधात महाराष्ट्र बचावचे आंदोलन पुकारले. उद्या (२२ मे ) रोजी या आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी परिपत्रक जाहीर केले. त्यावरून कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर त्या परिपत्रकाचा फोटो शेअर करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.


विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हणाले " हि नाटकाची स्क्रिप्ट आहे, कोणते डायलॉग असावे, ड्रेसकोड काय असावा... तथाकथित हिरोने एंट्री कुठं घ्यायची आणि विलेन कोणाला बनवायचे अशी संपूर्ण स्क्रिप्ट चंद्रकांतnपाटील यांनी लिहून ठेवली आहे. या स्क्रिप्टचे नाटक महाराष्ट्रात आजपासून भाजप सादर करणार आहे. स्क्रिप्ट कितीही योजनाबद्ध पद्धतीने लिहल्या गेली असली तरी कोरोना सारख्या गंभीर संकटात जनतेला मदत न करता नाटक करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता फ्लॉप करणार हे मात्र निश्चित " अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचावर केली.



कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना प्रत्येकजण करत आहेत. " या कोरोना विरुद्धच्या लढ्यात राज्यसरकार पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे" अशी टीका भाजपने राज्यसरकार वर केली. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जसे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर केले तसेच महाराष्ट्र सरकाने देखील शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज करावे अशी मागणी केली. या सरकारला जागे करून त्यांना काम करण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्र बचाव हे आंदोलन भाजपने पुकारले असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *