Breaking News

1/breakingnews/recent

विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

No comments
News24सह्याद्री - 

मुंबई : 
२१ मे रोजी ९ जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात दाखल केला. अखेर त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद जाते कि राहते याचा संभ्रम सर्वांचा मनात होता. याच पार्श्वभूमीवर सर्व राज्य मंत्री मंडळांनी राज्यपाल कोट्यातून उमेदवारी मिळावी म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस करण्यात आली. परंतु त्यांनी या शिफारसीवर प्रतिसाद न दिल्याने सर्व राज्यमंत्री मंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर चर्चा करत विधानपरिषद निवडणुकीला परवानगी दिली.

 २१ मे रोजी विधानपरिषद निवडणूक पार पडण्याची घोषणा केली. यामध्ये भाजप ४ जागांसाठी उमेदवार घोषित केले, शिवसेनेने २ जागांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने २ जागांसाठी उमेदवार घोषित केले, तर काँग्रेस ने १ जागांसाठी उमेदवार घोषित केले.

९ जागांसाठीचे उमेदवार 
भाजप - ४ - प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील
शिवसेना - २ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेस - २ - शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी
काँग्रेस- १ -  राजेश राठोड

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *