विशाखापट्टणम दुर्घटना; ११ लोकांचा मृत्यू जणांचा
News24सह्याद्री -
आंध्रप्रदेश :
विशाखापट्टणम येथे झालेल्या विषारी वायू गळतीमुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या ११ वर गेल्याची माहिती जनरल नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचे डायरेक्टर एस. एन. प्रधान यांनी दिली. आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम येथील गोपाळपट्टणमध्ये एलजी पॉलिमर कंपनीत विषारी वायूची गळती झाली होती. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाने ५ गावे रिकामी केली. अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर किंग जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांनी किंग जॉर्ज रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. या रुग्णांची भेट घेतल्यानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ह्या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला १ करोड तर व्हेंटिलेटर वर जे रुग्ण आहेत त्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली.

No comments
Post a Comment