Breaking News

1/breakingnews/recent

भोपाळ घटनेची पुनरावृत्ती

No comments
आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम  येथे विषारी वायूची गळती झाल्याने ८ जणांचा मृत्यू
News24सह्याद्री - 
आंध्रप्रदेश : 
आज पुन्हा भोपाळ गॅस गळती दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम येथील गोपाळपट्टणम मध्ये आज पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याने ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ह्या गॅस गळतीचा परिणाम आसपासच्या गावावर झाल्याने तेथील ५ गावे स्थानिक प्रशासनाने रिकामी केली आहेत. या गॅस गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांनी सांगितलं.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एडीएमएबरोबर बैठक बोलावली आहे. तसेच त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय  वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी या घटनेवर चर्चा केली. या घटनेबद्दल म्हणाले " माझं ह्या घटनेबाबत गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी बोलणं झालं असून यावर बारकाई ने लक्ष दिले जात आहे. मी विशाखापट्टणममधील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणार्थ प्रार्थना करतो".


यावर गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर आम्ही बारकाईने लक्ष देत असून यासंबंधी एनडीएमए अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केलीअसल्याचं सांगितलं. गॅस गळतीने प्रकृती बिघडलेल्यांना लवकर बरे वाटावे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *