भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सल्ला
News24सह्याद्री -
मुंबई :
केंद्र सरकारने अर्थचक्राला हातभार लागावा म्हणून देशव्यापी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीची दुकान उघडण्यास परवानगी दिली. सोमवारी अनेक ठिकाणी मद्यविक्रीची दुकान उघडली गेली त्या दुकानासमोर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. वाढती लोकांची गर्दी आणि सोशल डिस्टंन्सिंगचा उडालेला फज्जा लक्षात घेता काही ठिकाणची मद्यविक्री दुकान पोलिसांनी बंद केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला.
आशिष शेलार ट्विट करत म्हणाले कि “केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार, पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम!”

No comments
Post a Comment