Breaking News

1/breakingnews/recent

News24सह्याद्री Live update - धोका नसणार्‍या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन उठणार

No comments
हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन कायम । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले राज्याला अधिकार 
News24सह्याद्री - 

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत संपणार आहे. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि ३ मे नंतरच्या नियोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन संदर्भात महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

पंतप्रधानांच्या महत्वाच्या सूचना 
लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात राज्यांना निर्णय घेण्यास सांगितलं आहे. जे हॉटस्पॉट क्षेत्र आहे त्या ठिकाणच लोकडाऊन हे ३ मे नंतरही कायम राहणार आहे. तसेच जे ग्रीन झोन मधील ठिकाण अथवा जिल्हे आहेत तेथील लोकडाऊन शिथिल कराव्यात मात्र लोकडाऊन शिथिल केल्यानंतर त्या ठिकाणच्या सीमा बंद ठेवल्या जातील . जे ओरेंज झोनमधील जिल्हे आहे ज्यांची परिस्थीती सुधारली आहे अश्या जिल्ह्यामधेही खबरदारी घेत व्यवहार सुरु करण्याची परवानगी सरकार देऊ शकते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *