कोरोना Live Updates : देशभरात २१ हजार ७०० कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण ....
गेल्या २४ तासात १२२९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत ६८६ जणांचा मृत्यू देशभरात झाला आहे. एकट्या महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ७७८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६ हजार ४२७ वर गेली आहे.
No comments
Post a Comment