Breaking News

1/breakingnews/recent

येस बँकेत कोट्यवधींच्या ठेवी लटकल्या

No comments
नगर अर्बन, प्राथमिक शिक्षक बँकेसह इतर वित्तीय संस्थांच्या ठेवी । खातेदारांमध्ये उडाली खळबळ



अहमदनगर । नगर सह्याद्री -

कंपनी सुशासन आणि कर्ज वितरणातील अनियतितेमुळे येस बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. येस बँकेच्या अहदनगर शाखेमध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या कोट्यावधी ठेवी लटकल्या आहेत. या दोन बँकेप्रमाणेच इतरही सहकारी पतसंस्था व छोटे-मोठे व्यावसायिकांच्या ठेवी गुंतल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणात एकच खळबळ उडाली आहे.

कंपनी सुशासन आणि कर्ज वितरणातील अनियतितेमुळे येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. यामुळे येस बँकेच्या खातेदार व ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी बँकेच्या विविध शाखा व बँकेच्या एटीएममध्ये एकच गर्दी केली आहे. येस बँकेच्या ठेवीदारांमध्ये जिल्ह्यातील वित्तीय संस्थाचा मोठा सहभाग आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेसह इतर बँकांचाही समीवेश आहे. या दोन्ही बँकाच्या कोट्यावधींच्या ठेवी अडकल्याने बँक प्रशासनासह खातेदारांचे धाबे दाणाणले आहेत.

येस बँकेमध्ये सन 2017-18 च्या वार्षिक अहवालानुसार अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची चालू ठेव (कलेक्शन), चालू ठेव (पेमेंट) व चालू ठेव (सीटीएस) अशी तीन खाती आहेत. या तिनही खात्यामध्ये शिक्षक बँकेच्या कोट्यांवधींच्या ठेवी आहेत. नगर अर्बन बँकेनेही गंगाजळी म्हणुन कोटींची रक्कम ठेवलेली आहे. त्यातच नुकतेच अर्बन बँकेवर प्रशासक आलेले आहे. बँकेचा कारभारात सुधारणा होत असतांना येस बँकेवर आलेल्या निर्बंधामुळे अर्बनच्या ठेवीदारांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. या दोन्ही बँकेप्रमाणे शहर व जिल्ह्यातील इतर सहकारी पतसंस्था, वित्तीय संस्था, व्यापारी, व्यावसायिक यांचीची बचत खाती व ठेवी गुंतून पडलेल्या आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *