Breaking News

1/breakingnews/recent

आजपासून दहावीची परीक्षा

No comments
मुंबई । वृत्तसंस्था -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला आजपासून (3 मार्च) राज्यात सुरुवात होत आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणार्‍या या परीक्षेत 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीची संख्या 65 हजार 85 ने वाढली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल 70 टक्क्यांपर्यत घसरल्याने यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले असून, 80 गुण लेखी परीक्षेसाठी तर 20 गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील. राज्यात 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होईल. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परिक्षा होणार आहे.

यंदाच्या परीक्षेत 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा राज्यातून 110 तृतीयपंथी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण 4979 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यापैकी 80 संवेदनशील केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *