कोरोना : राळेगणसिध्दी पाठोपाठ हिवरेबाजारलाही पर्यटकांना बंदी
अहमदनगर । नगर सह्याद्री - सध्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. हिवरे बाजारमध्ये दररोज सर्वांगीण ग्रामविकासाची संकल्पना अनुभवण्यासाठी जगभरातून विविध क्षेत्रातील पर्यटक येत असतात. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे तो एकाकडून दुसर्याकडे जाण्याचा धोका मोठा आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत हिवरे बाजारला भेट देण्याचे टाळावे असा आग्रह ग्रामस्थांनी केल्यामुळे हिवरे बाजार भेटीस पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा, महाविद्यालय, नाट्यगृहे यांनीही खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात
शहरात कोरोनाचा रूग्ण आढळला आहे. त्यामुळे या आजाराचा शहरात प्रार्दुभाव वाढू नये यासाठी त्या रुग्णांच्या संबंधीत लोकांची तपासणी व खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच नगर शहरातील शाळा, महाविद्यालये, सिनेागृहे यांनीही खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, प्रसंगी त्यांना सुट्टी द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र देवून केली आहे.
No comments
Post a Comment